कर्तव्यावर असतांना मृत झालेल्यांच्या वारसांना शासकीय मदतीचे धनादेश वाटप
अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा | पोलीस पाटील हा महसूल आणि पोलीस प्रशासनातील महत्वाचा दुवा असतो. अनेक पोलीस पाटलांचा कर्तव्य बजावतांना मृत्यू झाला असून या कोरोना हुतात्म्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. कोरोनामुळे हुतात्मा झालेल्या चार पोलीस पाटलांच्या वारसांना शासकीय मदत प्रदान करतांना पालकमंत्री बोलत होते.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असतांना अनेक पोलीस पाटलांना प्राण गमवावे लागले आहे. त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रत्येकी पन्नास लाख रूपयांचीएकूण 2 कोटी रुपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली अमळनेर तालुक्यातून 4 पोलीस पाटलांनी प्राण गमावले असून त्यांच्या वारसांना आज प्रत्येकी पन्नास लाखांच्या शासकीय मदतीने धनादेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिलदादा पाटील यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा आहे. तो महसूल आणि पोलीस प्रशासनातील दुवा असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतो. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी देखील पोलीस पाटलांनी अतिशय कर्तव्यदक्षतेने काम केले. यामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले. मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन हे खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाला आमदार अनिलदादा पाटील.; पोलिस निरीक्षक जयपालजी हिरे , स.पो.निरीक्षक राहुल फुला , खान्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील, धरणगांव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे
अमळनेरयेथिल पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष भानुदास पाटील व लखीचंद पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाला सर्व पोलीस पाटील संघटनेचे जिल्हापदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्ष हजर होते. अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन आर. जे. पाटील सर यांनी केले.