एरंडोल राजमुद्रा वृत्तसेवा | पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही. पक्षाचा एक विचार एक झेंडा एक नेता यापेक्षा कोणीही मोठे नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिशय हिरारीने आलेल्या कठीण समस्यांचा मुकाबला करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी केले.
एरंडोल शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे छत्री वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात उप तालुका प्रमुख रवींद्र चौधरी, विधासभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपसरपंच संदीप पाटील यांचा समावेश आहे. या कार्यक्रमास रवींद्र जाधव, सुनील माणुधने, संजय खांडू महाजन, प्रसाद दंडवाते, रूपेश माळी, अरुण महाजन, संदीप पाटील, गजानान महाजन, गोपाल महाजन, महेश महाजन, भिका चौधरी, विनोद मराठे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद महाजन यानी केले.