जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नसली तरीही संजय गरुड यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यकर्त्यांची फळी तयार झाली आहे. त्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी या महोत्सवातून प्रयत्न सुरू आहेत. ज्या तरुणांना या महोत्सवात नोकरी मिळाली नाही तरीदेखील त्यांनी नाराज न होता जीवनात नेहमी आशावादी राहावे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संजय गरुड, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्षा मंगला पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कल्पना अहिरे, जिल्हा परिषद सदस्या प्रमिला पाटील सरोजिनी गरुड, माजी सदस्य प्रदीप लोढा, डि. के. पाटील, वकील सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर बोरसे, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, वाल्मीक पाटील, नगरपालिकेचे माजी गटनेते अनिल पोहरा, रुपेश चीपड, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, सरचिटणीस माधव चव्हाण, कळमसरा सरपंच अशोक चौधरी, भगवान पाटील, आबासाहेब पाटील, पुणे येथील जॉब्स कनेक्टचे संचालक आर. एम. गायकवाड, जॉब शोकेसचे संचालक श्रीराम सातपुते आदी उपस्थित होते.
या महोत्सवात राज्यातील ४२ नामवंत कंपन्यांच्या ६० प्रतीनिधींनी बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच कंपन्यांमध्ये दहा हजार बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संदीप हिवाळे, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, प्रल्हाद बोरसे, दीपक महाराज, जितेश पाटील, शेख इमरान, राजू नाईक, प्रभू झाल्टे, मोहन चौधरी, सागर कुमावत, राजू जेंटलमेन, किशोर खोडपे, डॉ. बाजीराव पाटील, शैलेश पाटील, राहुल इंगळे, गजानन गव्हारे, योगेश पाटील, संतोष झाल्टे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीराम सातपुते, सूत्रसंचालन दिनेश पाटील तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.