जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरातून जात असलेल्या चौपदरीकरण महामार्गाचे अजिंठा चौफुलीवर उड्डाण पुलाची आवश्यकता असल्याचे जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच सालार नगर जवळील नाल्यावरील चुकीच्या कामा बाबत दुसरे तक्रार अर्ज दाखल केले.
सालार नगर जवळील नाल्यावरील पुलाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून ते काम नाल्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाखालुन येणारे पाणी हे पूर्णपणे कासमवाडी व मासूमवाडी या नागरी वस्तीत शिरून हानी होण्याची शक्यात निर्माण होऊ शकते. तसेच अजिंठा चौक उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास सालार नगरच्या अंडरपासची आपोआप सुविधा होणार असल्याने यासाठी लागणारा निधी वाचला जाऊ शकतो. याबाबत राजमार्ग प्राधिकरणचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी माहिती दिली होती, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, आरको रोडवेजचे बशीर बुर्हानी, मनसेचे जमील देशपांडे, ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह, अपनी गल्लीचे अताउल्लाह खान, इंजिनिअरिंग असोसिएशनचे इंजि. जाहिद शेख, जळगाव शहर महानगर काँग्रेसचे अध्यक्ष नदीम काझी, अल्पसंख्याक शिव सेना महानगर प्रमुख झाकीर पठाण, राष्ट्रवादीचे मझहर खान, अडव्होकेट आमीर शेख आदी उपस्थित होते.