यावल राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात गावठी कट्टा कंबरेला लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने तात्काळ दखल घेत एकाला अटक केली असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे जिल्ह्यात गावठी कट्टा तसेच रिव्हॉल्वर गुन्हेगार कोणताही परवाना नसताना आवरत असून अनेक घटना उघडकीस येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार यावल शहरात वास्तव करणारा यश राजेंद्र पाटील वय 20 रा.सूंदर नगरी यांच्या कडे 20 हजार रुपये किमतीची गावठी कट्टा असून तो मुख्य बाजार पेठेत खुलेआम पणे आवरत आहे व दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक असलेले किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करून यावल येथे संशयीताला पकडण्यासाठी पाठवण्यात आले यश हा नेमका बाजार पेठेत पथकाला आढळून आला त्याची अंगझडती व चौकशी केली असता त्याच्या कंबरेला गावठी बंदूक लावलेली आढळून आली आहे
यश पाटील याला तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरून अटक करीत ताब्यात घेतले आहे यावल पोलीस स्टेशन भाग-6 85/2021 अर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यवाही मध्ये स.फौ.अशोक महाजन, स.फौ.शरीफ काझी,पो.ना.युनुस शेख,पोना किशोर राठोड, पोकाँ. विनोद पाटील , पो काँ रणजित जाधव ह्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग नोंदवीला आहे.