(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने लसींच्या समान वाटणी वर भर द्यावा. महाराष्ट्राच्या लसी महाराष्ट्रालाच देण्यात याव्यात अशी मागणी करत केंद्र सरकारने लसीकरणाचे राजकारण करू नये असा टोला आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकार वर लगावला आहे.
कोरोनाची पार्श्वभूमी पाहता लसीकरण गरजेचे असताना केंद्र सरकारने लसीकरणाला घेऊन राजकारण करू नये. नागरिकांची समस्या समजून घ्यावी. ज्या लसी महाराष्ट्राला मिळायला पाहिजे त्या महाराष्ट्रालाच देण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी केली. तसेच लसींच्या समान वाटणी वर भर देऊन उगाच लसिकरणात राजकारण करू नये असे वक्तव्य रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले.
कोरोनासारखी गंभीर परिस्थिती असतानाही केंद्र सरकार लसीकरणाला घेऊन राजकारण करत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी चार रुग्णांच्या मागे एक रेमडीसीविर उपलब्ध आहे. तर याउलट गुजरातमध्ये एका रुग्णाच्या मागे तीन रेमडीसीविर उपलब्ध करून दिल्या जात आहे. केंद्र सरकारने हा भेदभाव निदान आजच्या दिवशी तरी करू नये असा सवाल जनता करत असल्याचा टोलाही मोदी सरकारवर लगावला.