जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात पुरामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, जळगाव मधील जी.एम. फाउंडेशन व एम.आय.डी.सी. उद्योजक बांधवांतर्फे पूरग्रस्तांना मदत म्हणून दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. याआधीही दोन दिवसांपूर्वी आ. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्रात कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आरोग्य दूत म्हणून नावलौकिक असलेले माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे सध्या पूरग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तळ ठोकून आहेत. जळगाव येथून जी.एम. फाऊंडेशन आणि एम.आय.डी.सी. उद्योजक बांधवांच्या सहयोगातून जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उद्योजक राजू आडवाणी, संतोष इंगळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक रवाना करण्यात आले.
याप्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रा.भगत सिंग निकम, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, जी.एम. फाउंडेशन संपर्क प्रमुख अरविंद देशमुख, मंडळ अध्यक्ष अजित राणे, शक्ती महाजन, विनोद मराठे, युवा मोर्चाचे जयेश ठाकूर आदी उपस्थित होते.