चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा |ज्या गावाचे रस्ते चांगले असतील त्या गावाचे लोक श्रीमंत होतील तसेच ज्या गावाला जाणाऱ्या रस्त्यांच्या वाटा चांगल्या होतील त्या गावांना विकासाच्या वाटा मोकळ्या होतील याच भावनेतून डोंगर वस्ती परिसरातील सुमारे 52 तांड्यांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सात्तत्याने केले आहे. याच हेतूने आज 80 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असल्याचा आनंद आहे अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
खेरडे ते सोनगाव रस्त्याचे काम खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला होता. आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जी.प. सदस्य पोपट तात्या भोळे, जिल्हा सरचिटणीस के.बी.दादा साळुंखे, पंचायत समितीचे उप सभापती भाऊसाहेब पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, माजी पं.स. सदस्य दिनेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन, माजी सरपंच गोरख राठोड,तालुका उपाध्यक्ष विजाभज आघाडी ममराज जाधव,किसान मोर्चा उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील,हरीभाऊ राठोड,शिवाजी जाधव,बळीराम जाधव,पोपट पाटील,नेमीचंद राठोड,भिकन जाधव,बाबुलाल राठोड, माजी सरपंच रवीआबा राजपुत,अनिल चव्हाण लोंजे, मुकेश गोसावी, चेतन वाघ, सर्वेश पिंगळे, शेषराव चव्हाण, सचिन पाटील,रांजणगाव चे उपसरपंच बबलू पाटील, त्रिदल सैनिक संघटनेचे आबासाहेब गरुड, नंदू पाटील, गोकुळ पाटील, विजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी के.बी.दादा साळुंखे यांनी प्रास्ताविक तर ममराज राठोड यांनी आभार मानले.