जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अविनाश सादिक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली बैठकीमध्ये पक्ष संघटनेच्या वाढी सबोट जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फेर बदल करण्याबाबत चहरचा झाली त्यानुसार राष्ट्रवादीच्या महानगर अध्यक्ष पदी एकनाथ खडसे समर्थक अधिक लाडवंजारी तर जिल्हाध्यक्ष पदी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नियुक्ती करिता पक्ष श्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान लवकरच या दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा पक्षाच्या वतीने केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या प्रकृतीमुळे हि बैठक होणार कि नाही अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहिल्याने बैठक घेण्यात आली त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,यांच्यासह जळगाव जिल्हा अध्यक्ष अँड रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँकेच्या चेरमन अँड रोहिणीताई खडसे, आ. अनिल भाईदास पाटील, माजी आमदार मनीष जैन,नामदेव चौधरी,उमेश नेमाडे,प्रवक्ते योगेश देसले,जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार,विनोद देशमुख,अर्बन सेल कार्याध्यक्ष मनोज वाणी, एजाज मलिक, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अरविद मानकरी,मुवीकोराज कोल्हे,रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन तसेच पक्ष संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी पक्षाच्या श्रेष्टींनीं जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची फेर बदल केली आहे. या बदलाच्या नवीन निवडीचे राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले तरी निष्ठावंता च्या एका गटामध्ये काहीशी नाराही असलेली दिसून आली आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येऊन नऊ महिने झाले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन झाले नव्हते महानगर अध्यक्षपदी खडसे समर्थकांना संधी देऊन त्यांना न्याय दिल्याचे सांगितले जात आहे. पक्षामध्ये आणखी काही प्रमुख कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.