जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वॉटरग्रेस कंपनीला शहरातील साफसफाईचा ठेका पाच वर्षासाठी देण्यात आला, परंतु या ठेकेदारा मार्फत शहर मनपा हद्दीतील कुठल्याही भागात साफसफाई केली जात नाही. निविदा काढतांना संबंधीत ठेकेदाराला सोईच्या द्रष्टीने अशा अटी शर्ती टाकण्यात आल्या आहेत यात जळगाव मनपा प्रशासन देखील सहभागी आहेत, या मुळे या ठेकेदारावर अट शर्थी न टाकल्यामुळे कोणतीची कारवाई केली जात नाही तसेच करता येत नाही, या पुर्वीच्या साफसफाईच्या अडअडचणी संदर्भात सर्व अटी शर्ती मनपा प्रशासनाने काढून टाकले काढून टाकल्याचा आरोप माजी नगरसेविका डॉ अश्विनी देशमुख यांनी केला आहे.
वॉटरग्रेस कंपनीला सोईच्या होतील अशा अटी शर्थी टाकून ठेकेदाराला गैरव्हार करण्यास मदत होईल या हेतूने हे सर्व करण्यात आले आहे. मागील साफसफाईच्या ठेकेदाराच्या अटी शर्थी संपूर्ण चौकशी व्हावी आणि यातून सर्व कटकारस्थान गैरव्यवहार उघडकीस येणार आहे, तसेच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी साफसफाई मिळेल यासाठी वरिष्ठ स्तरांवर स्पेशल ऑडीट करून चौकशीचे आदेश देण्यात यावे असे अश्विनी देशमुख यांनी निवदेनात म्हटले आहे.