जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात विद्यापीठ प्रशासन सापडले आहे. विद्यापिठातील वित्त लेखा अधिकारी एस. आर. गोहिल सरांनी राजिनामा कुलगुरु महोदय कडे सोपविला उत्तर पत्रिकाच्या मोठ्या प्रमाणातील खर्चास मंजुरीला विरोध केल्यामुळे त्यांचा राजिनामा घेतला गेला या संदर्भात तसेच लासा करण्यात यावा विद्यापिठातील अधिकारी कोनाच्या दबावाला बळी पडून राजिनामा देताय याचा खुलासा करावा.अशी मागणी राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी केली आहे.
गेल्या काळात कुलगुरु ह्यानी ठेकेदार यांच्या दबावाखाली राजिनामा दिला आहे तेच करण्यासाठी आता पन राजीनामा सत्र सुरु आहे का असा सवाल देखील कुणाल पवार यांनी उपस्थित केला आहे. प्रभारी कुलगुरु महोदय यांच्यावर दबाव आहे का ? असा उपरोधिक सवाल प्रभारी कुलगुरूंना विचारण्यात आला आहे.
कौरौना काळात ऑनलाइन परीक्षा विद्यापिठाने घेतली तरी एवढा खर्च कसा झाला.? निविदा कोणत्या नियमानुसार राबवण्यात आल्या पाच कोटीची बिले काढण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर कोणाचा दबाव होता. बिले काढण्यासाठी वित्त अधिकारी का म्हणून दिरंगाई करीत आहे का बिलावर शी न करता राजीनामा दिला गेला यासंदर्भात कुलगुरूंनी खुलासा करावा अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. संशयित असलेली बिले काढन्यात येऊ नये अन्यथा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी महानगर सचीव अँड कुणाल पवार,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचीव भुषण भदाने यांनी पत्रक काढून या संदर्भात जाब विचारला आहे.