एरंडोल राजमुद्रा वृत्तसेवा । एरंडोल येथील शिवसेना कार्यालयात चालू असलेल्या शिवसेना अभ्यासिका मधील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साठी वाव मिळवा अभ्यास मदत व्हावी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने यांनी स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे स्पर्धा परीक्षेचे पुस्तके मोफत उपलब्ध करून दिले आहे. गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी सामाजिक धोरण स्वीकारत डॉ हर्षल माने यांनी विद्यार्थ्यांना आधार दिला आहे.
कार्यक्रमात पुस्तके वाटप करतांना शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटिल, उप तालुका प्रमुख रवि चौधरी,शिवसेनेचे कार्यकर्ते प्रमोद महाजन,रवींद्र जाधव, सुनील माणुधने, संजय खांडू महाजन, प्रसाद दंडवाते, रूपेश माली, अरुण महाजन, संदीप पाटिल, गजानन महाजन, गोपाल महाजन, महेश महाजन, भिका चौधरी व समस्त शिवसैनिक यांच्या हस्ते यावेळी पुस्तके वाटप करण्यात आले.