जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्यातील थोड्या निधी अभावी प्रलंबित प्रकल्पावर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भर द्यावा त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद कशी होईल यासाठी सतत प्रयत्नशील राहील पाहिजे असा मोलाचा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अजित पवार यांनी दिला आहे. या बैठकीला जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी परमुख्याने उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ८० व ९० टक्के झालेले प्रकल्प कोण-कोणते आहे याची ,माहिती व आढावा घेतला तसेच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने संघटन मजबूत केले पाहिजे जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची आवशक्यता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्या कडून देखील जिल्ह्यात सुरु असलेल्या कामकाजा संदर्भात माहिती जाणून घेतली
दरम्यान बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी देखील केली त्यामुळे पक्षात अनेक वर्षांपासून पदांवर राहून कार्य न करणाऱ्या कार्यकर्त्यांची जंत्री देखील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे मांडली परंतु राष्ट्रवादी मध्ये महानगर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदाबाबत फेरबदलाची शक्यता तूर्त तरी नसल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभय्या पाटील यांनी सांगितले जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती प्रलंबित प्रश्न, कार्यकर्त्यांची जबाबदारी पक्ष वाढी साठी प्रयत्न यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये भर दिला आहे.
कार्यकर्ते संभ्रमात
दरम्यान राष्ट्रवादी मध्ये फेर बदलाची शक्यता वर्तवली जात होती तशी चर्चा देखील दोन्ही गटांमध्ये सुरु होती परंतु या महत्वाच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मृग गिळून बसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे फेर बदलाचा हा पिल्लू कोनी सोडला ? याचा शोध देखील पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेत असल्याचे सांगण्यात आले तसेच कोविड कालावधी मध्ये शहरासह जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना खास बोलावून त्यांचा कौतुक देखील अजित पवार यांनी केले.
या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे प्रकृतीच्या अस्वास्थामुळे ते उपस्थित राहू शकले नसल्यामुळे फेरबदला संदर्भात कोणीतीच चर्चा होऊन निर्णय न झाल्याचे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.