जळगाव राजमुद्रा वृतसेवा | महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय गणित बदलले असून महापौर निवडीनंतर पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडीच्या हालचाली जोमाने सुरू झाल्या आहेत. दरम्यान या समिती मधून नियुक्ती होणाऱ्या सदस्यांच्या रिक्त जागेवर निवडणुकीवर भाजप व बंडखोरांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
मनपात गटनेत्याची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने कोणाचा विषय लागू होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. पालिकेत भाजपच्या २७ बंडखोरांच्या मदतीने शिवसेनेने सत्ता ताब्यात घेतलेली असली तरी आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत बंडखोरांनी नाट्यमयी घडामोडी सुरु केल्या आहेत. दोन महिन्यात स्थायी समिती सभापती निवड होणार आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून याची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या ताब्यातील स्थायी समिती सभापती पद खेचून आणण्यासाठी शिवसेना व बंडखोरांकडून तयारी केली जात आहे . तसेच यासाठी प्रशासन व न्यालयीन पातळीवर लढा देण्याची तयारी सुरु आहे. १ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती १६ पैकी ८ जागा 1 ऑक्टोबर रोजी स्थायी समिती 16 पैकी 8 सदस्य रिक्त होणार आहेत. त्यांच्या जागी नविन सदस्य निवडतांना भाजपच्या कोट्यातील 5 जागांवर पक्षांचे किती व बंडखोर किती याकडे लक्ष लागून आहे. त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
हे सदस्य होणार निवृत्त
सभापती राजेंद्र घुगे पाटील भाजप, नवनाथ दारकुंडे बंडखोर, मुंकुदा सोनवणे भाजप, प्रतिभा देशमुख बंडखोर, रेश्मा काळे बंडखोर, नितीन लढढा शिवसेना, नितीन बरडे शिवसेना, शेख सहिदा युसुफ एन आय एन हे 8 सदस्य स्थायी समितीतून निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नविन सदस्यांची निवड केली जाणार आहे.