(राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक, पर्यटन उद्योगप्रमाणेच राज्यातील धोबी (परिट) समाजातील लाॅड्रीधारकांनाही वीज बिलात व मालमत्ता करात सवलत देण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी काॅग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांना परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी (दि.९) रोजी ईमेलने पाठवले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नितीन राऊत यांना देखील हे पत्र पाठवण्यात आले आहे. राज्यातील धोबी (परिट) समाज अतिशय गरीब आहे व रोज दिवसभर कपडे धुलाई व प्रेस करुन जिवन जगत आहेत. धोबी (परिट) समाजातील लाॅड्री धारकांच्यावतीने विनंती करण्यात आली आहे की राज्यात लाॅड्रीधारक अडचणीत आहेत वीज बिल तसेच मालमत्ता कर ही भरु शकत नसल्याने फारच आर्थिक संकटात आहेत. अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांचा मार्गदर्शनाखाली सदर पत्र पाठवण्यात आले आहे. धोबी समाजाला सरकारने कुठलेच आर्थिक पाॅकेज जाहिर केले नसल्याने किमान आपण आमच्या समाजाच्यावतीने लाॅड्रीधारकांना वीज बिलात व मालमत्ता करात सवलत मिळावी यासाठी मुख्यमंत्रीना पत्र पाठवुन व सवलत मिळवुन द्यावी अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काॅग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांना इ मेल द्वारे पाठवण्यात आले आहे.