अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा | मनुष्य जीवन जगतांना आयुष्यात सुख व दुःख नेहमी येत असते. सुखात भारावून न जाता व दुःखात निराश न होता प्रत्येकाने दोन्ही वेळी एक झाड लावून त्यांचे संवर्धन करावे असा उपदेश संत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला आहे.
येथील ॲड ललीता पाटील इंन्टरनॅशनल शाळेच्या प्रांरगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमांत ते बोलत होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन शेती तोट्यात न करता फायद्यात कशी राहील या विषयी काही महत्वाच्या टिप्स दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा करावा, प्रत्येक शेतकऱ्याने शेतात शेततळे करावे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आ. साहेबराव पाटील, ॲड ललीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, संचालक प्रा. श्याम पाटील, पराग पाटील, प्रफुल्ल पाटील, श्याम अहिरे, जि.प.सदस्य संगीता भिल, शितल देशमुख, हिरालाल पाटील हे व्यासपीठावर हजर होते. ॲड ललीता पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांचा सत्कार केला.