यावल राजमुद्रा वृत्तसेवा | यावल येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत प्राप्त माहिती नुसार, मुख्यअधिकारी बबन तडवी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्यांच्या पथकांने लाच घेतांना कारवाई करून अटक केली. साठवण बंधाऱ्यांच्या कामासाठी एका कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी मुख्याधिकाऱ्याने लाच मागीतल्याची तक्रार जळगांव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पथकाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचला. यात मुख्य अधिकारी बबन तडवी हे २८ हजार रुपयांची लाच घेतांना जाळयात अडकले. त्यांना एसीबीच्या पथकांने रंगेहाथ अटक केली आहे.