जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हयातील रावेर यावल सह जळगांव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर केळी उत्पादन मोठया प्रमाणात होत असले तरी, यासाठी डांबरीकरण केलेल्या रस्त्याची नेहमी डागडुगी करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन केळी उत्पादन होत असलेल्या क्षेत्रात क्रॉक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते तालुक्यातील किनोद येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे हे होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थीत तालुक्यातील फुफणी ग्रा.प. समोर वृक्षारोपण करण्यात आले. या अंतर्गत बारा फुट उंच असलेल्या 500 वृक्षांची लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, वृक्ष फक्त लावून उपयोगाचे नसून त्यांना वाढवणे आवश्यक आहे. कृषी हा देशाचा आत्मा असून विकासाचा केंद्रबिंदू देखिल आहे. सर्व शिवरस्त्यांचे डांबरीकरण करण्याला आपण प्राधान्य देणार असल्यांचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना प्रमुख विष्णु भंगाळे, प.स. सभापती ललिता पाटील, माजी सभापती शितल पाटील, माजी सरपंच प्रभाकर पाटील, यांचे समयोचित भाषण झाले. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. कमलाकर पाटील, राजेंद्र् चव्हाण, संजय पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, कैलास चौधरी, मुरलीधर पाटील, अनिल भोळे, रामकृष्ण पाटील, गजानन सोनवणे, मुकंद नन्नवरे, समाधान चिंचोले, आदि उपस्थित होते.