राजमुद्रा वृत्तसेवा | यमुना नदीने धोक्यांची पातळी ओंलाडल्याने दिल्ली प्रशासनाने अतिसावधनतेचा इशारा दिला आहे. यमुना नदीने 205.33 मीटर धोक्याची पातळी गाठल्यानंतर प्रशासनाच्या वतीने हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यमुनेच्या पुर प्रवण मैदानी भागातील रहिवासींना तेथून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.
राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जुन्या रेल्वेपुलावर पाण्याची पातळी 205.34 मीटर नोंदविण्यात आली. सकाळी 8.30 वाजता ही पातळी 205.22 मीटर होती असे सुत्रांनी सांगितले. सलग पावसामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. संबधित सर्व विभागांना सतर्क करण्यात आले आहे. विविध भागात 13 बोटी तैनात केल्या आहे. आणि 21 बोटी सज्ज ठेवले आहेत. असे पाटबंधारे आणि पुरनियत्रण विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.