भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | भुसावळ येथे बनावट दारुचा धंदा सुरु असतांना स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चौघा कर्मचाऱ्यांना निलबित करण्यात आले आहे. या प्रकाराने काही भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
यासंदर्भात माहिती असी की, काही दिवसापूर्वी भुसावळ शहरातील शिवपूर कन्नाडा रस्त्यांवरील एका फर्निचरच्या दुकानाच्या गोदामावर छापा टाकून तेथे सुरु असलेल्या बनावट दारुचा कारखाना उध्दवस्त करण्यात आला होता. हा कारखाना सुरु असतांना पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांने कारवाई केली होती. यामुळे ‘संबधीत अधिकारी काय करत होते?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान या घटनेची राज्य उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार भुसावळ येथील निरीक्षक आय एन वाघ यांच्या सह के बी मुळे, एस एस निकम, एन बी पवार या चार जणांना निलबिंत करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्कांचे सचिव कांतीलाल उमप यांनी हे आदेश जारी केले आहेत. जळगाव जिल्हयांतील राज्य उत्पादन शुल्क विभागांतील काही तथातथित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार यापुर्वी देखील चर्चेचा विषय ठरला असून यांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.