जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मराठा विदया प्रसारक संस्थेच्या नु.म. महाविदयालयात गेल्या चार वर्षाच्या मस्टरवर संस्थेच्या नसलेले भरती झाली असल्यांचे कर्मचारी आहे असे भासवून बनावट सहया करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आठ जणांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मराठा विदया प्रसारक संस्थेच्या नुतन मराठा महाविदयालयाचे प्रभारी अध्यक्ष ॲड विजय भास्करराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 जुलै 20-21 रोजी ॲङ विजय पाटील हे संस्थेच्या कार्यालयात बसलेली असतांना ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य ए.बी.वाघ यांच्या दालनात सायकांळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान पाच महिला व दोन पुरुष असे एकूण 7 अनओळखी व्यक्ती तसेच उपप्राचार्य ए.बी वाघ, प्रकाश आनंदा पाटील, शिवराज मानके हे सर्व जण उपप्राचार्याची कॅबीन बंद करुन खोटे व बनावट मस्टर तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ॲङ विजय पाटील, वसंत चौधरी, पियुश नरेंद्र पाटील, यश सुभाष चौधरी हे उपप्राचार्य यांच्या कॅबिन मध्ये गेले असता त्यांनी निलेश रणजित भोईटे व प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्या सांगण्यावरुन गेल्या चार वर्षाचे कॅलेंडर घेवून मस्टर वर बनावट सहया करत असल्याचे आढळून आले. यावेळी ॲङ विजय पाटील यांनी सदर मस्टर ताब्यात घेतले. या मस्टर ची तपासणी केली असता. त्यात सौ. ए.एस. भोळे, श्रीमती. एम.ए.धामणे व एन.एस.गावंडे यांच्या नावाच्या पुढे जुन जुलै पर्यंतच्या एका बनावट मस्टर वर तर दुसऱ्या मस्टर वर जुन ते ऑक्टोबर पर्यत स्वाक्षरी केलेल्या आढळून आल्या.
ॲङ विजय पाटील यांनी बनावट मस्टर ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे. 31 जुलै रोजी ॲड विजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन निलेश रणजित भोईटे प्राचार्य लक्ष्मण प्रताप भोईटे , उपप्राचार्य ए.बी.वाघ,शिवराम माणके, प्रकाश आनंदा पाटील, श्रीमती एम.एन. धामने, एन.एस.गावंडे, ए.एस.भोळे यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संस्थेची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शिंदे करीत आहे.