जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत स्त्री ला लग्नांचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रानी दिलेली माहिती अशी की, शहरातील समता नगरात राहणाऱ्या एका विवाहीतेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळ राहणाऱ्या राजेश भिमराव सांळुके यांच्या सोबत प्रेमसबंध जुळले होते. राजेश साळुंके याने महिलेला लग्नांचे आमिष दाखवले होते. दरम्यान तिच्या पतीला या बाबत कळल्याने त्याने तिला सोडचिडडी दिली. राजेश साळुंके यांने एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर विवाहीतेला त्याच्यामुळे एक अपत्य झाले. मंदिरात विवाह केल्यानंतर ही राजेश साळुंके विवाहीते सोबत राहत नव्हता. काही दिवस मालेगाव येथे राहील्या नंतर त्यांचे वडील व भाऊ त्याला घेवून जळगावी घेवून आले. त्यामुळे दोघे वेगळे राहत होते. एकदा राजेश ने विवाहीतेला हॉटेल मध्ये घेवून जबरदस्तीने अत्याचार केला. असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. राजेश आपल्या सोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहीतेने रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.