जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | संकट काळात मदत करणे ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. परंतु या कालावधीत आ गिरीश महाजन किती काळ जामनेर मध्ये थांबले? त्यांनी पूरग्रस्तांसाठी काय केले? असा उपरोधिक टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. जळगाव येथील शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फे कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केलेल्या वाहन चालक तथा कोरोना योद्ध्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सन्मान करून १६१ कोरोना योद्ध्यांना विमा संरक्षण कवच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी आरोप करावेत, हे त्यांचे कामच आहे. आपण फक्त काम करीत राहणार.” याप्रसंगी त्यांनी शिवसैनिकांनी संकटकाळात केलेल्या कार्याचा गौरव केला.
‘मला कुठल्याही राजकारणात अडकायचे नाही. मी माणूस आहे. माणूस म्हणून माणसाची संकटात मदत केली पाहिजे.
पूरग्रस्तांच्या मदतीला आ. गिरीश महाजन धावून गेले, त्यांना मदत केली. ही चांगली बाब आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर पलटवार करताना सांगितले की, ‘चांगल्या कामाचे कौतुक व्हावे परंतु त्यांनी सांगावे की कोरोना कालावधीत ते जामनेर मध्ये किती काळ होते?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.