जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जनमत प्रतिष्ठान तर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा माननीय महापौर सौ जयश्री सुनील महाजन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलतांना महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, सत्कार झाल्यानंतर सन्मान टिकवणे व पुढे यश प्राप्त करणे फार अवघड असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात एक ध्येय ठेवून आपल्या अभ्यासाची व भविष्याची एक रणनीती आखावी.
यावेळी नगरसेविका निता सोनवणे, प्रतिभा देशमुख, सुचित्रा महाजन, विवेक सोनवणे, शुक्ला सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, गुणवंत पाटील, प्रतिभा मेटकर, संजय कुमार सिंग, राजेंद्र वर्मा, विजय पाटील हर्षाली पाटील,सुनील सोनवणे, विशाखा वाणी, वसंत कोलते उपस्थित होते. यावेळी जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पाटील व सुरेंद्र सिंग पाटील यांनी वृक्षारोपण व अन्नदान केले.