फैजपूर राजमुद्रा वृत्तसेवा | शेती उत्पादनात केलेले नवनवीन उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तसेच स्व. पंकज महाजन प्रतिष्ठा सतत प्रत्यनशील आहे, व यापुढेही राहू. असे प्रतिपादन आ. शिरीष चौधरी यांनी स्व. पंकज महाजन कृषी साधना पुरस्कार प्रंसगी केले.
शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आ. शिरीष चौधरी यांनी दिली. धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाच्या प्रारंगणात या पाचव्या पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्याचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील फळबाग् तज्ञ डॉ. भगवानराव कापसे नागपूर येथील बांबू मिशनचे समन्यवयक आर.डी. पाटील उपस्थीत होते. प्रास्तावित कृषीविज्ञान केंद्र पालचे महेश महाजन यांनी केले.
व्यासपीठावर मधुकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भागवत पाटील, धनजंय चौधरी, रमेश पाटील, मा. नगरअध्यक्ष हरिष गलवाणी, जिल्हा बॅकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, ज्ञानेश्वर महाजन , सावदयाचे माजी नगरध्यक्ष राजेश वानखेडे, लिलाधर चौधरी, अजित पाटील, विलास तायडे, प्राचार्य डॉ, व्ही.आर. पाटील, डॉ. पी.आर. चौधरी, डॉ. राजेंद्र पाटील, रमेश महाजन, पंचायत समिती सदस्य सुरेखा पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंकज महाजन मित्र परिवार व कृषी उद्योग पाल यांच्यावतीने करण्यात आले.