(राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात सध्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड औषधांमुळे आता रुग्ण जरी बरे होत असले तरी
म्युकरमायकोसिस सारख्या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र सध्या या आजाराच्या रुग्णांनी वाढत जात असून यावर तात्काळ उपाय योजनांची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार सध्या सतर्क झाले असून म्युकरमायकोसिस या आजारावर वापरण्यात येणारे एम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन हाफकीन संस्थेकडून कडून मोठ्या संख्येत मागवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण सध्या महाराष्ट्राला मोठ्या संकटात नेत असल्याचे चित्र दिसत आहे. या अंतर्गत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या आजारावर उपायकारक असलेल्या एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनच्या एक लाख डोसची ऑर्डर हापकिन संस्थेला दिली असून येत्या तीन दिवसात ते मिळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढ असून त्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपाय केले जाणार असल्याचे शासनाकडून मान्य झाले आहे. त्यातल्या त्यात हाफकीन कडून एम्फोटेरिसिन बी या एक लाख इंजेक्शनची मागणी पाहता राज्यसरकार या आजाराला घेऊन ठोस पावले उचलण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.