जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मणियार बिरादरीच्या तडजोड समिती तर्फे गेल्या साठ दिवसात दाखल प्रकरणा पैकी चार प्रकरण तलाक करण्यात आला, तर दहा जोडप्याना करार नामा करुन पुन्हा वैवाहिक जीवनाची संधी दिली आहे.
लॉकडाउन च्या काळात जुन व जुलै या दोन महिन्यात वीस प्रकणांची नोंद झाली होती त्याची पंधरा प्रकरणात अंतिम कारवाई केली आहे, त्यात पती पत्नीच्या आपसातील समजोता करारा नुसार चार तलाक केले व तर एका प्रकरणात पत्नीने पतीपासून विभक्त होण्याची इच्छा प्रदर्शीत केल्याने तीला विभक्त देण्यात आले आहे. तर दहा वैवाहिक लोकांना अटि शर्थी सह करारनामा करुन त्यांना पुढच्या वैवाहीक जीवनांची संधी दिली आहे. अशा प्रकारे वीस प्रकरणांतून पंधरा प्रकरणात अंतिम निर्णय झाला असून पाच प्रकरणातील कामकाज प्रगतीपथावर असल्याचे बिरादरीचे अध्यक्ष हरुप शेख व तडजोड समितीचे अध्यक्ष सैय्यद चाँद यांनी सांगितले आहे.
जळगावातच नव्हे तर महाराष्ट्र मध्य प्रदेश, व गुजरात या राज्यातुन देखील विविध्र बिरदारीतील वैवाहीक वादाची प्रकरणे जिल्हा मणियार बिरादरी कडे येत असतात बिरदारीकडे आतापर्यत 2232 प्रकरणांची नोंद झाली आहे. फारुख शेख, सय्यद चाँद, हरु शेख, सलीम मोहम्म्द, ताहेर शेख, अलताफ शेख, इक्बाल वजीर, साजिद मुसा हे सदस्य आहेत.