राजमुद्रा वृत्तसेवा रावेर | शहरातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेने माऊली हाॅस्पीटलमध्ये तीळ्यांना जन्म दिला. डाॅक्टरांच्या प्रयत्नाने नाॅर्मल प्रसुती करण्यात आली असून ,तीघ मुलांसह मातेची तब्येत चांगली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन या महिलेस प्रसव पिडा जाणवू लागल्याने माऊली हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती बघता नाॅर्मल प्रसूती हाेण्याचे चिन्ह दिसत नव्हते. डाॅ. संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नाॅर्मल प्रसूती केली. दुपारी १.२२ वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. तिघ ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित हाेताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली हाेती, व माऊली हाॅस्पीटलचे डाॅक्टर संदीप पाटील व कर्मचाऱ्यांचे काैतुक करत होते