(राजमुद्रा वृत्तसेवा) 18 ते 44 या वयोगटातील लसीकरणासाठी आता राज्य सरकारला लस खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र या खरेदीवर केंद्र सरकारच्या मर्यादा असणार असल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यामध्ये राज्यांसाठी दोन कोटी लसींचे डोस खरेदी करण्याची परवानगी मिळाली असून केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी विशिष्ट कोटा ठरवलेला आहे. 18 ते 44 या वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणावर या लसी असणार आहेत.
एक मे पासून राज्यांमध्ये 18 ते 44 या वयोगटात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर राज्य सरकारने या वयोगटातील लसीकरण बंद करण्याचाही निर्णय घेण्यापर्यंत विचार के केला असल्याचे दिसून येत आहे. इतका या वर्गासाठीचा लस तुडवडा परिणामकारक ठरला आहे. या परिस्थितीत केंद्राकडून ही दिलासादायक बातमी हाती आली असून केंद्र सरकारने या दोन कोटी लसी संपूर्ण देशासाठी 18 ते 44 या वयोगटाकरिता आरक्षित केल्या आहेत. मात्र या वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणावर राज्य सरकारांना या लसी दिल्या जाणार आहेत. दोन कोटी लसी राज्य सरकार आता खरेदी करू शकणार असले तरी राज्यांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक असणार असल्याचे दिसून येत आहे.