जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसापासून विविध कारणामुळे जळगाव पोलीस अधिक चर्चेत आहे, अनेक घटनां व कारणांमुळे मुळे कर्तव्यात कसून अथवा बेकायदशीर कामात प्रत्यक्षात सहभाग असणाऱ्या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना बदली तसेच बडतर्फ कऱण्यात आले सार्वधिक घटना ह्या राजकीय क्षेत्रातील निगडित असलेल्यामुळे घडल्याचे निष्पन्न झाले आहे शहर पोलीस ठाण्यात फौजदार असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा निवृत्तीचा कार्यक्रमात आधीच्या गंभीर गुन्ह्यात संशयित असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्या सोबत गाण्यावर ठेका धरल्यामुळे शहर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी अडचणीत आले आहे स्थानिक वृत्तपत्रांनी या प्रकरणाचा उहापोह केल्याने हे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. एका खाजगी कार्यक्रमात नाचणे हि चूक कशी ठरू शकते ? राजकीय हितसंबंध व सतत होणार हस्तक्षेप यामुळे जळगाव पोलिसांना ग्रहण लागल्याची चर्चा आहे.
यापूर्वी राज वाईन्स प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ व अन्य कर्मचारी त्यांच्यावर थेट बडतर्फ़ाची कार्यवाही करण्यात आली होती, यामध्ये देखील राजकीय नेत्यांचा मोठा सहभाग होता राजकीय नेत्यांमध्ये भागीदारी असलेल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी अडचणीत येतात राज वाईन्स प्रकरणात प्रत्यक्षात गुन्हयात हस्तक्षेप असल्याने तो गुन्हाच होता मात्र निवृत्त कर्मचारी सोनवणे यांनीं केलेल्या आयोजित खाजगी कार्यक्रमात नाचणे हा कुठला गुन्हा आहे ? अनिल चौधरी अनेक गुन्हयात संशयित म्हणून आहे त्यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही हद्दपारीचा प्रस्ताव जरी प्रलंबित असला तरी अशी कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही मात्र पोलीस दलाने केलेल्या कार्यवाहीमुळे अनेकांच्या भुवया उणचवल्या आहे.
कार्यवाही बाबत चर्चा
पोलिस कर्मचाऱ्यांनी चौधरी यांच्यासोबत नृत्याचा ठेका धरला होता. हा व्हिडीओ साेमवारी व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबधित ५ कर्मचाऱ्यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली केली. या कार्यवाही बाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. खाजगी कार्यक्रमात गाण्यावर डान्स करीत होते सरकारी नियमाचे कुठलेही उल्लंघन झालेले नाही किंवा पोलीस खाकी घातलेली दिसून येत नाही पोलिसांना देखील खाजगी आयुष्य आहे, सरकारी जागेत अथवा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही मग कार्यवाही कोणत्या आधारावर केली जाते ? अनिल चौधरी यांना आयोजकांनी निमंत्रण दिले होते त्यात त्या पाच कर्मचाऱ्यांचा काहीच संबंध नाही खाजगी आयुष्य जगणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे केलेली कार्यवाही नेमकी कोणच्या दबावामुळे करण्यात आली अशी चर्चा सध्या जिल्हा पोलीस दलात सुरु आहे.
काय आहे व्हिडीओ मध्ये
त्या ठिकाणी अनिल चौधरी हे सहाय्यक फौजदार सोनवणे यांच्या निवृत्ती कार्यक्रमात त्यांना शुभेच्या देण्यासाठी पोहचले या पूर्वीच काही पोलीस कर्मचारी गाण्यावर ठेका धरत नाचत होते अनिल चौधरी यांना नाचण्यासाठी आग्रह धरण्यात आला नेमके कंट्रोल जमा झालेले पोलीस कर्मचारी देखील त्याच ठिकाणी नाचत होते. यामुळे कार्यवाही केल्याचे सांगितले जात आहे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे हे मुंबई येथे असून आल्यावर पुढील कार्यवाही कडे लक्ष लागले आहे
काय आहे प्रकरण ?
जळगावातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सेवेत असलेल्या पोलिसांनी भुसावळच्या अनिल चौधरी साेबत धरलेला नृत्याचा ठेका मोबाइलमध्ये चित्रित झाला आणि सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला पोलीस दलात तो व्हिडीओ वादाचा विषय ठरला आहे. अनिल चौधरी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी नुकताच प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यावर पोलीसात विविध गुन्हे दाखल आहे या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्याच्या ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांना तडकाफडकी ‘कंट्रोल जमा’ करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे.
हे आहेत पाच कर्मचारी
विजय निकम, प्रफ्फुल्ल धांडे, गणेश पाटील, योगेश पाटील व गौतम केदार अशा या ५ कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली यामुळे खळबळ उडाली आहे, . हे कर्मचारी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत होते.