जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरात एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे स्टेट बँकेत नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याचे २० हजार ५०० रुपये परत सुस्थितीत परत दिल्याने जळगाव शहर पोलीस दलातर्फे कौतुक केले जात आहे. पोलीस दलातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, व्यवसायाने रिक्षा चालक असलेले विजय प्रकाश पाटील रा. जळगाव यांनी आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या परमेश्वर दत्तू पाटील यांना आपल्या रिक्षातून खोटे नगर येथे रिक्षाने सोडले. स्टेट बँक ऑफ इंडिया अजिंठा चौफुली शाखा येथे नोकरीस असलेले परमेश्वर पाटील यांची पिशवी अनावधानाने रिक्षात राहून गेली होती. मात्र रिक्षाचालक विजय पाटील यांनी त्यांच्या सामानातून त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला व सदरची पिशवी व रोख रक्कम कागदपत्रांसह इत सुस्थितीत वेळेत परत केली. लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही रिक्षाचालक विजय पाटील यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे जळगाव शहर पोलीस दलातर्फे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या हस्ते विजय पाटील यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.