जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नूतन मराठा महाविद्यालयात सात कर्मचारी गेल्या चार वर्षापासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देत असल्याचे खोटे मस्टर (रेकॉर्ड) वर एकाच दिवशी सह्या करताना संस्थेचे प्रभारी अध्यक्ष ॲड. विजय भास्करराव पाटील यांनी रंगेहात पकडले होते. यासंबंधी पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हया मध्ये भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० प्रमाणे १२०-B, ४६५, ४६७, ४६८, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे आरोपींच्या अडचणीत अधिक वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. सदर गुन्ह्या मध्ये अद्याप कोणत्याच आरोपींनी जामीन घेतलेला नाही. तसेच काही आरोपींनी रीतसर रजा टाकली असून ते अध्याप फरार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, स्व. नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत असल्याची चर्चा आहे. यासाठी ॲड. पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याचे कळते. त्यामध्ये प्राचार्य डॉ. एल पी देशमुख, उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके-पाटील, पी ए पाटील यांचा समावेश आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.