मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेली वास्तू १ मे पासूनच खुली झाली असून जुन्या वास्तूचं उद्घाटन केलं गेल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. “महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारती बाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगतही केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
मुंबईतील एका पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडत विरोधकांना टोलाही लगावला.