जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले आहे. या बैठकीत पत्रकार व मीडिया प्रतिनिधींना प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला होता. अतिशय गुप्त बैठक जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील व्हॅटिलेटर प्रकरण
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकडे वाढ कमी झाल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिली असल्याचे समजते, या बैठकीमध्ये सध्या गाजत असलेल्या व्हॅटिलेटर घोट्याळ्या संदर्भात अधिकृत माहिती नीलम गोऱ्हे यांच्या समोर देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे. अथवा उपस्थित लोकप्रतिनिधींनी देखील बैठकीत वाच्यता केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आलेले व्हॅटिलेटर मध्ये पैशाची मोठी अफरातफर झाल्याचे तक्रारदार दिनेश भोळे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणले आहे. यासंदर्भात नेमकी काय चर्चा होते याकडे लक्ष लागून आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना केल्या याबाबत विचारणा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली आहे.
जी. एम. पोर्टल वरून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोरोना काळात व्हॅटिलेटर खरेदी करण्यात आले यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे समोर आले आहे.