जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार असून सीईटी परीक्षेकरिता करण्यात येणाऱ्या अर्जाची मुदत संपली आहे. सीबीएसईचा निकाल उशिराने जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी वंचित राहिले असल्याने सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुदतवाढ संदर्भात राज्यातीलभरातील पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आ. रोहित दादा पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्वीय सचिव विजय भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा केली आहे. त्यांना याबाबत अवगत केले असून आगामी काळातही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले असल्याचे सांगितले.