जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून देशाला १९२८, १९३२, १९३६ असे सलग तिन ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या व जर्मनीचा तानाशाह हिटलरने जर्मनीचे नागरिकत्व व एयरफिल्ड मार्शल पदाची आँफर दिली असता देशाच्या सन्मानार्थ धुडकावून लावणाऱ्या देशभक्त मेजर ध्यानचंद यांचे नाव देवून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.पृथ्वीराज पवार पाट
ील यांनी आभार मानले.
१९९१-९२ सालीच खेलरत्न पुरस्काराची सुरुवात करतांना काग्रेस सरकारने खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव द्यायला पाहिजे होते असे मतही त्यांनी व्यक्त केले. काग्रेसची निष्ठा गांधी घराण्याशी असल्यामुळे त्यांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देता आले नसेल अशी टिका करत त्यांनी उशिरा का होईना परंतु मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची दखल घेतली गेली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत मनापासून आनंद झाल्याचे डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी सां
गितले.