पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा |( विशाल बागुल) भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या बी. पी. सी. एल. कंपनीतर्फे “डिझेल अँट युवर डोअर स्टेप ” उपक्रमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील पाचोरा जिल्हा जळगाव स्थित श्री गजानन पेट्रोलियम या पेट्रोल पंपा पासून करण्यात आला. बी. पी. सी. एल. कंपनीचे ई.डी.(रिटेल) मा. श्रीमान पी.एस. रवी यांच्या शुभहस्ते या उपक्रमा अंतर्गत ग्राहकाच्या घरापर्यंत डिझेल पुरवणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवून आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता या अभिनव योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे अधिकारी मा श्री के. रवी ( रिटेल वेस्ट हेड), बायो गॅस प्रोजेक्ट्चे (रिटेल इंजि.अँड कॉम्प्रेसड विभागाचे ), सी. जी. एम. मा. श्री संजीव अग्रवाल, तसेच हायवे रिटेलिंग रिटेल चे डी.जी. एम. श्री गौरव, आणि रिटेल वेस्ट विभागाचे डी जी एम इंजिनीअरिंग श्री भगदीकर आर.फ्यूल हमसफ़र – मितेश जैन ( स्टेट मैनेजर, महाराष्ट्र) यांचेसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील रिटेलचे मुख्य रामन मलीक, व हायवे रिटेलिंग चे जि. एम. (रिटेल वेस्ट) मा अनुप तनेजा या मान्यवरांसह महाराष्ट्रातील बीपीसीएल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. श्री गजानन पेट्रोलियम व श्री गजानन उद्योगसमूहातर्फे डीलर सौ लता ताई सोनार (माजी नगरसेविका, न पा पाचोरा) श्री राजाराम नागोशेट सोनार, युवा उद्योजक श्री प्रमोद सोनार, डॉ. श्री दिनेश सोनार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील शेतकरी आरोग्य सेवा व शैक्षणिक सेवा यांना ज्यांना लागणारे इंधन त्यांच्या त्यांच्या कार्य स्थळापर्यंत पोहचवून शेती, आरोग्य, शिक्षण यासह अन्य लोकोपयोगी वाहने व यंत्रे यांना गतिशील ठेवण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे. या अंतर्गत शेती मशागत करणारे ट्रॅक्टर व शेती उपयोगातील यंत्रे यांचे इंधन संपल्यावर शेती मशागतीची कामे बंद पडतात. केवळ एका फोन कॉलवर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या शेतीयंत्रा पर्यंत आवश्यक डिझेल पोहोचवण्यात येईल. या सेवेसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क किंवा अधिभार लावण्यात येणार नाही अशी ही योजना आहे. ग्रामीण भागातील जनरेटरवर चालणारे रुग्णालये, ऑपरेशन थिएटर, रुग्णवाहिका, शैक्षणिक बसेस, शेती व्यवसायातील सर्व प्रकारची यंत्रसामुग्री यांना डिझेल अँट युवर डोअर स्टेप चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेली ही योजना भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने अमलात आणली. विशेषतः महाराष्ट्रातील पाचोरा सारख्या ग्रामीण भागातून या योजनेचा शुभारंभ होत आहे. पाचोरा येथील श्री गजानन पेट्रोलियम पंपा पासून या योजनेला सुरुवात होत असल्याने खानदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातून बीपीसीएल कंपनीचे कौतुक होत आहे. सेल्स व सर्व्हिस मध्ये श्री गजानन पेट्रोलियम सदैव अग्रस्थानी आहे. बीपीसीएल कंपनी च्या सर्व ग्राहकोपयोगी योजना उत्तमरित्या राबवून गुणवत्ता, सचोटी व सेवा पुरवणारे श्री प्रमोद राजाराम सोनार यांचा मान्यवरांनी या वेळी गौरव केला. या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील अश्या स्वरूपाच्या पहिल्याच आगळ्यावेगळ्या “लोकोपयोगी घरपोच इंधन” योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला बीपीसीएल चे टेरिटरी मॅनेजर अभिजीत चव्हाण, टेरेटरी समन्वयक प्रणय मोटे, इंजीनियरिंग ऑफिसर प्रीतम सूर्यवंशी व जळगाव जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर अमुल्य धुरीया यांची विशेष उपस्थिती होती. या शुभारंभ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गजानन पेट्रोलियम चे मॅनेजर भूषण वाडेकर, तसेच कर्मचारी अनिकेत मिस्तरी, यशवंत सोनवणे, सचिन तेली, सिद्धार्थ सोनवणे, कुलदीप घोडेस्वार, दीपक मिस्तरी, प्रकाश मोरे, तोताराम घोडेस्वार, व वाल्मिक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.