जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील गोलानी मार्केट मधील ब्रेकर पॉईंट या दुकानासमोर चक्क वडील सोबत असताना एका तरुणीची दोन जणांनी छेड काढल्याचा खबळजनक प्रकार उघडकीस आला आहे, घटनास्थळी त्या तरुणीच्या वडिलांनी या दोन नराधमांना जाब विचारताना हटकले असता त्या ठिकाणी ते हुज्जत घालू लागले हे बघून नागरिकांची गर्दी जमा होऊ लागल्याने घटनेचे गांभीर्य कळताच स्थानिक नागरिकांनी त्या दोन नराधमांना चांगलाच चोप दिल्याचे समजते आहे यामध्ये एकाचे नाव इरफान , दुसऱ्याचे सलमान असल्याचे समजते. नागरिकांच्या कचाट्यातून सुटण्यास साठी दोन नराधमांकडे असलेली दुचाकी सोडून घटनास्थळावरून पसार झाले आहे. Mh 19 DL 2481 ही दुचाकी अद्याप पर्यत गोलानी मार्केट परिसरातील ब्रेकर्स पॉईंट या दुकानासमोर उभी असून यावेळी तणावाचा वातावरण घटनास्थळी निर्माण झाले आहे.
छेड काढणाऱ्या तरुणांचे नाव इरफान तर दुसरा सलमान असल्याचे समजते. तरुणी सोबत जन्मदाते वडील असताना तिची छेड काढण्याचा प्रकार झाल्याने कायद्याचा धाक उरला नसल्याचा पर्यत आला आहे, भरदिवसा मार्केट परिसरात तरुणीची छेड काढण्यात आल्याने त्या नराधमांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी होत आहे.