(राजमुद्रा धुळे) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच सध्या रमजानचा पवित्र महिना चालू असल्याने शासकीय नियमांचे पालन करत मुस्लिम बांधवांनी कुठल्याही धार्मिक स्थळे किंवा मोकळ्या जागेवर गर्दी न करता घरीच साध्या पद्धतीने रमजान साजरा करण्याचे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार यांच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय योजनेत आलेले आहेत. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हास्तरीय लॉकडाउनही लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची ही परिस्थिती लक्षात घेता सध्या सुरू असलेल रमजानचा महिना साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा. कुठल्याही शासकीय नियमांचे उल्लंघन न करता प्रशासनाला मदत करावी. कोरोना विषाणूपासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव होण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन करावे असे आवाहन धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी सुध्दा महामारी, संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी घरात थांबून दक्षता घ्यावी, अशी शिकवण दिली आहे, असेही पालकमंत्री सत्तार यांनी सांगीतले.
Firoz shaikh Hil sk Aluminium Jalgaon
8624874086