राजमुद्रा वृत्तसेवा | ६ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे व खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा भाजपा उपाध्यक्ष नंदू महाजन रावेर येथील भाजपाचे कार्यकर्ते प्रल्हाद पाटील जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी नवी दिल्ली येथे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची वित्त मंत्रालयात जाऊन भेट घेतली. भागवत कराड यांचे मंत्री झाल्याबद्दल जळगाव जिल्ह्याच्या वतीने च्या वतीने स्वागत करण्यात आले. भागवत कराड यांना जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना केंद्र सरकारच्या योजनेमधून उद्योग उभारणीसाठी अर्थसाहाय्य होणेबाबत चर्चा केली व निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भागवत कराड यांनी आपण स्वतः जळगाव जिल्ह्यात येऊन सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांचा मेळावा घेऊन त्यांना सूचना करू. ज्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी अर्थ सहाय्य पाहिजे असेल त्यांनी योग्य तो प्रकल्प निवडून राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क साधावा जळगाव जिल्ह्याच्या उद्योग उभारणीस चालना द्यावी असे आश्वासन त्यांनी दिले.