जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या वतीने दिनांक ९ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ११ वाजता जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, सैनिक जनतेचे सीमेवर राहुन संरक्षण बंधनातून सेवा निवृत्त झालेल्या सैनिकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आ.राजु मामा भोळे, आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे प्रदेश प्रमुख शानाभाऊ सोनवणे, लताताई सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हापोलिस अधिक्षक प्रविण मुंडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, पंचायत समितीच्या सभापती ललिताताई पाटील,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलाश चौधरी, मनपा स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना शहरप्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी महापौर भारतीताई सोनवणे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, जळगाव शहर महापालिकचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी वाल्मिक नगर, मारोती मंदिर चौक
जळगाव येथे समाज बांधवांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे जिल्हा प्रमुख मोहन शंकपाळ यांनी केले आहे.