मुंबई राजमुद्रा वृतसेवा | बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीत केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने शिक्षकांना नाकरण्यात आले आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी मुंबई महानगरपालिकेला २१ जून रोजी पत्र लिहिले होते. मात्र एक महिना उलटूनही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. येत्या १५ दिवसांत उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सूचक इशारा शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी दिला आहे.
केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने १५० शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरतीत नाकारण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीत मार्च महिन्यात मांडला गेला होता. आज ४ महिने उलटूनही या प्रस्तावावर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. याविषयी जाब विचारला असता संबंधित विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले जाते व महापालिकेला प्रस्ताव दिल्याचे राज्य सरकार सांगते. हे ढकलाढकलीचे राजकारण योग्य नसल्याचं शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी सांगतले.