पारोळा राजमुद्रा वृत्तसेवा | मैत्री कुल निवासी कल्याण छात्र शक्ती संस्थेचे सदस्य सिद्धार्थ रागिणी महेश गणाई यांनी रायगड जिल्ह्यापासून सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास सुरु केला असून सर्व जिल्ह्यातील शेतकरी, विध्यार्थी, यांच्याशी संवाद साधत ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल पर्यावरणाच’ असे सामाजिक ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
रायगड जिल्हा पासून सुरू केलेला हा प्रवास पारोळा येथे पोहोचला असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने संचालक कृष्णा क्रिटिकल केअर हॉस्पिटल पारोळा यांच्या येथे मुक्कामी आहे. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करत सत्कार करण्यात आला. सत्कार करताना डॉ. दिपाली हर्षल माने, डॉ.नावेद मेमन, डॉ.निलेश देसले आदी उपस्थित होते. सिद्धार्थ गणाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.