जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील रिंग रोडवर मुख्य चौकालगत असलेल्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व तुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे पाणी पंचवीस ते तीस फुट उंचा पर्यंत उडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रिंग रोडवरील मुख्य चौकातून भूअंतर्गत पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. या ठिकाणी असलेल्या एअर व्हॉल्व तुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून पाण्याची नासाडी झाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी झाल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागला. यामुके परिसरात मोठी वाहनांची वर्दळ निर्माण झाली होती.
जे सी बी च्या साहाय्याने जलवाहिनीतून उडणाऱ्या उंच फवाऱ्याला रोखून धरण्यात आले होते. सुमारे पाऊण तासांनी जलवाहिनीचा प्रवाह बंद करण्यात आला. दरम्यान लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनासाठी पोहोचले असून पुढील कामकाज केले जात आहे.