राजमुद्रा वृत्तसेवा | डिझेलसाठी पैसे नसल्याने रद्द केलेल्या एसटी बसवर असणाऱ्या चालक आणि कंडक्टरना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला असून गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एसटी कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.
कामगार संघटनांकडून संथ गतीने सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून वेतन विलंबित आहे. पुढचा पगार कधी येईल हा प्रश्न नेहमीच असतो. बस चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसे नाहीत आणि यामुळे बस रद्द झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास सांगितले जाते. हे एक संकट आहे, ” असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी सांगितले.
“चिंतेचे आणखी एक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचे लसीकरण. ९७,००० कर्मचारी सदस्यांपैकी सुमारे ५५,५१६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, जे फक्त ५० टक्के आहे. आता ही प्रक्रिया आणखी मंदावली आहे कारण स्थानिक पातळीवर अनेक वेळा, आगार व्यवस्थापक लसीकरणासाठी आवश्यक सुट्टी देत नाहीत. जालना, लातूर, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत निराशाजनक परिस्थिती झाली आहे. एमएसआरटीसीच्या केवळ २० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले आहे, ”असेही बर्गे म्हणाले.
या दरम्यान, एमएसआरटीने गणेश उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी २,२०० जादा बस चालवण्याची योजना आखली आहे. परतीच्या प्रवासासाठी १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान एसटी बस असणार आहेत. लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानामुळे, गेल्या वर्षी महाराष्ट्र परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरटीसी चा खर्च कमी करण्याचा आणि राज्यभरात त्याचे कामकाज व्यवहार्य करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा कठीण काळ होता आणि ते बाहेर पडण्यासाठी लढत होते.
डिझेलच्या कमतरतेमुळे सेवा रद्द केल्यामुळे कर्मचाऱ्यांना रजेवर जाण्यास सांगितले जात असल्याच्या संघटनांच्या आरोपांबाबत प्रशासनाने बस डेपोकडे या संदर्भात माहिती मागितली आहे.