जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील साखर कारखान्याला ७५ कोटी रुपये कर्ज मंजूर झाले असून वेळोवेळी या कर्जाची उचल लेखन झाले आहे. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ई डी ने जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे.
मुक्ताईनगर येथील कारखाना येथील संचालक मंडळात जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांचा समावेश असून त्या व्हाईस चेअरमन आहेत. जिल्हा बँकेने सहकारी कारखान्यांना कर्ज न देता खासगी कारखान्यांना कर्ज दिले असल्याने याविषयी देखील जिल्हा बँक सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहे. ईडीच्या नोटीसने सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व चेअरमन रोहिणी खडसे हे मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत नोटिशीला लवकरच उत्तर देणार असल्याचे सूत्रांकडून समजते.