रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | मोहरमनिम्मित सार्वजनिक मिरवणुकीला परवानगी नसल्याचे सांगत शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिला.मोहरम सणानिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ मुंडे अध्यक्ष्यस्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर डीवायएसपी विवेक लवांड, तहसीलदार उषाराणी देवगुणे, बीडीओ दीपाली कोतवाल, पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे उपस्थित होते.
डॉ मुंडे यांचा राजकीय पक्ष, विविध संघटनांनी तसेच उपस्थित मान्यवरांचा एपीआय शीतलकुमार नाईक, पीएसआय मनोजकुमार वाघमारे, पीएसआय अनिस शेख यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी केले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, सीईओ रवींद्र लांडे, इमाम गायासोद्दीन, पद्माकर महाजन, अयूयूब पहेलवान यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला नगरसेवक असिफ मोहम्मद, सादिक शेख, दिलीप कांबळे, पद्माकर महाजन, कांता बोरा, कल्पना पाटील, महेमुद शेख, अशोक शिंदे, पंकज वाघ, शेख गयास, सुवर्णा भागवत यांच्यासह शांतता समिती सदस्य , हिंदू सेवा संघटना, मुस्लिम पंच कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.