जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री जन आरोग्यदायी विमा योजनेत बीपीएल स्तरावरील आर्थिक परिस्थिती असलेल्या नागरिकांची नांवे आले असून त्यांना आयुष्यमान कार्ड बनवून देण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी जळगाव शहर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी ही मोहीम जळगाव शहरात राबवली असून त्यांना स्मार्ट कार्ड बनवून देण्यात येणार आहेत
९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते संध्या ५ पर्यंत धनाजी काळे नगर पुष्पांजली कॉलनी छत्रपती शिवाजी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर सरचिटणीस योगेश कदम यांनी ही मोहीम राबवली. जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील व जेष्ठ समाजसेवक शिवराम पाटील संतोष भिंताडे नगरसेवक नवनाथ दारकुंडे , नगरसेवक संदेश भोईटे, फिरोज शेख, संजय कदम, बाबा लोहार विशाल अण्णा वाघ , फरदीन खान, रितेश जाधव, संतोष जैन, दीपक शिरसाट, योगेश जैन, कुणाल तरडे, विनोद पाटील, भूषण भालके, अंकुश वाघ, हरीश जैन, लोकेश जावरे, मयुर पाटील, हरीश कदम, आकाश सणस, दीपक धमाळ, सन्माननीय नागरिक यांनी विशेष उपस्थिती देऊन मार्गदर्शन केले.