(राजमुद्रा जळगाव) मे आणि जून या कालावधीत राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून देणायत येणारे स्वस्त आणि मोफत धान्य एकत्रित रित्या देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे केली आहे. याबाबतची दखल जिल्हा पुरावठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी घेतली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
मे आणि जून महिन्यात गरीब गरजू नागरिकांना राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकार कडून वाटप करण्यात येणारे नियमित स्वस्त धान्य व मोफत धान्य याचे काही धान्य वितरकांकडून गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी सदर धान्य वाटप दोन टप्प्यात न वाटता मे आणि जून या महिन्याची वाटप एकत्र करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यरकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे. सोबतच अशा प्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एका महिन्याचे वाटप करून दुसऱ्या महिन्याचे रेशन परस्पर गहाळ करण्याचा काही धान्य वितरकांचा मनसुबा असल्याचा संशय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. मात्र आहे अन्य आपण होऊ देणार नाही. हे धान्य गरीब गरजू लोकांपर्यंत पोचवल्याशिवर राहणार नाही असे गुप्ता यांनी सांगितले.