जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारतिय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरची १२ ऑगस्ट रोजी भाजपा कार्यालय येथे समर्थ बुथ अभियान अंतर्गत महत्वपुर्ण बैठक विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे व उत्तर महाराष्ट्र बुथ संपर्क प्रमुख बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या प्रसंगी अनासपुरे यांनी समर्थ बुथ अभियानांचा मंडल शहा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी बोलतांना रवी अनासपुरे म्हणले, पक्षाने सुरू केलेल्या समर्थ बुथ अभियान जळगाव शहरातील ३९१ बुथवर १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या प्रत्येक बुथ वर ध्वजवंदन व भारत माता पुजन करायचे आहे. भाजपा कार्यकर्ता हा ३६५ दिवस काम करणारा कार्यकर्ता असुन हे अभियान आपल्याला यशस्वी करायचे आहे.
उत्तर महाराष्ट्र बुथ संपर्क प्रमुख बबनराव चौधरी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला असुन जळगाव जिल्हा त्यात एक नंबरवर आहे. आपण हे अभियान प्रत्येक बुथ स्तरावर राबवायचे आहे. दरम्यान जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी महानगर तील ९ मंडलचा आढावा सादर केला.
या बैठकीला जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा श्रेत्र प्रमुख दिपक सारखे, जिल्हा पदाधिकारी बापु ठाकरे, महेश चौधरी, प्रा भगतसिंग निकम, राजेंद्र मराठे, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, शक्ति महाजन, विजय वानखेडे, केदार देशपांडे, आघाडी अध्यक्ष लताताई बाविसकर, गणेश वाणी, जयेश भावसार, गुडू भाई, हेमंत जोशी, अनिल जोशीं,रेखा वर्मा आदी उपस्तीत होते.